Tech Update : Motorolaने लाँच केले दमदार स्मार्टफोन्स

Tech Update : Motorolaने लाँच केले दमदार स्मार्टफोन्स

Published by :

बाजारात नवनवीन प्रकारचे स्मार्टफोन येत आहेत. अशातच मोटोरोलाने आपले दोन नवीन दमदार स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहे. Moto G30 आणि Moto G10 हे दोन फोन लाँच केले आहेत. कंपनीने या दोन्ही फोनला युरोपमधील काही देशात लाँच केलं आहे. तसेच भारतात लवकरच हे फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

मोटो G30 चे फिचर्स

  1. मोटो G30 फोनमध्ये 720×1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत 6.5 इंचाचा IPS LCD दिला आहे.
  2. डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनचा डिस्प्ले नॉज डिझाइनचा आहे.
  3. या फोन ला 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
  4. फोनच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात 64 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.
  5. फोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम ऑप्शन आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणार आहे.
  6. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट दिला आहे.
  7. मोटो G30 ची किंमत 180 यूरो म्हणजेच जवळपास 15,900 रुपये आहे.

मोटो G1 चे फिचर्स

  1. मोटो G10 या फोनमध्ये कंपनीने 60Hz च्या रिफ्रेश रेट 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला आहे.
  2. फोनला 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढू शकते.
  3. फोनमध्ये 460 चिपसेट दिला आहे. जो स्नॅपड्रॅगन 662 चे एक क्लॉक्ड डाऊन व्हर्जन आहे.
  4. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलसोबत 2 मेगापिक्सलचा कॅमेरे दिले आहे.
  5. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
  6. फोनला पॉवर देण्यसाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 10 वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  7. मोटो G10 ची किंमत 150 यूरो म्हणजेच जवळपास 13,200 रुपये आहे.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com