Iphone 17 Pro : नव्या कॅमेरा डिझाइनसह मार्केटमध्ये करणार धमाका

Iphone 17 Pro : नव्या कॅमेरा डिझाइनसह मार्केटमध्ये करणार धमाका

मोबाईल फोटोग्राफीचा अनुभव अधिक उत्तम होण्याची अपेक्षा आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

Apple कंपनीने आपल्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 17 Pro ची तयारी सुरू केली आहे. तांत्रिक विश्लेषक आणि लीक्सनुसार, हा नवा आयफोन iPhone 16 Pro पेक्षा खूप वेगळा आणि अद्ययावत असणार आहे. विशेषतः कॅमेरा डिझाइनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार असून, यामुळे मोबाईल फोटोग्राफीचा अनुभव अधिक उत्तम होण्याची अपेक्षा आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, iPhone 17 Pro चा डमी मॉडेल समोर आला आहे. यात कॅमेरा डिझाइन संपूर्ण फोनच्या मागच्या बाजूस विस्तारलेलं दिसत असून, Google Pixel फोनच्या डिझाइनची आठवण करून देतो. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप, फ्लॅश आणि सेन्सरमधील मोकळी जागा हे वेगळेपण दर्शवतात.

iPhone 17 Pro मध्ये ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, अल्ट्रा-वाइड आणि टेलीफोटो लेंस यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याशिवाय, फ्रंट कॅमेरा २४ मेगापिक्सेलचा असू शकतो, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी उत्तम गुणवत्ता देईल.

फोनच्या इतर फिचर्समध्ये फारसा बदल अपेक्षित नसला तरी डिझाइन आणि कॅमेरा तंत्रज्ञान यावर कंपनीचा विशेष भर असल्याचे संकेत मिळत आहेत. Apple यावेळी अ‍ॅल्युमिनियम बॉडी वापरणार असल्याने फोन अधिक हलका आणि किंमतीमध्ये थोडा फरक असण्याची शक्यता आहे.

सध्या ही माहिती अनौपचारिक असून Apple कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, असा अंदाज आहे की iPhone 17 Pro यंदा सप्टेंबरमध्ये लॉन्च होईल. इच्छुक ग्राहकांनी थोडी वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com