Nokia चा दमदार C30 स्मार्टफोन लाँच

Nokia चा दमदार C30 स्मार्टफोन लाँच

Nokia ने आज एकसाथ तीन नवीन फोन सादर केले आहेत. यात रगेड फोन XR20, फिचर फोन Nokia 6310 आणि लो बजेट स्मार्टफोन Nokia C30 चा समावेश आहे. हे तिन्ही फोन जागतिक बाजारात वेगवेगळ्या फीचर्स आणि वेगवेगळ्या किंमतीत लाँच केले गेले आहेत.

Nokia C30 ची किंमत
Nokia C30 हा स्मार्टफोन कंपनीने सध्या युरोपमध्ये लाँच केला आहे, हा फोन येत्या काही दिवसांत जगभरात लाँच केला जाऊ शकतो. युरोपियन मार्केटमध्ये Nokia C30 स्मार्टफोन 2GB + 32GB, 3GB + 32GB आणि 3GB + 64GB अश्या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या सर्व मॉडेल्सची किंमत कंपनीने सांगितली नाही परंतु नोकिया सी30 सीरीजची किंमत €99 म्हणजे 8,500 रुपयांच्या आसपास सुरु होईल, असे सांगण्यात आले आहे.

Nokia C30 स्पेसिफिकेशन्स
नोकिया सी30 स्मार्टफोन कंपनीने 6.82-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह सादर केला आहे. हा 'वी' नॉच असलेला डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. Nokia C30 स्मार्टफोन 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A आणि Android 11 (Go edition) वर चालतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com