व्हॉट्सअ‍ॅपवर आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅटिंग

व्हॉट्सअ‍ॅपवर आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅटिंग

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग अ‍ॅपवर आता युजर्सना इंटरनेटशिवायही चॅटिंग करता येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग अ‍ॅपवर आता युजर्सना इंटरनेटशिवायही चॅटिंग करता येणार आहे. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने जगभरातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्स इंटरनेटशिवायही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकणार आहेत.ज्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांच्या जिवलग व्यक्तींपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रॉक्सी फीचर आणले आहे.

मेटाकडून व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर आणण्यात आले असून जगभरातील युजर्ससाठी पॉक्सी सपोर्ट सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपवर इंटरनेटशिवायही चॅटिंग करणे सोपे होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट टॅबमध्ये सेटिंग्जवर टॅप करा. स्टोरेज आणि डेटा प्रॉक्सी यावर टॅप करा. प्रॉक्सी वापरा. वर टॅप करा. प्रॉक्सी सेट करा. वर टॅप करून प्रॉक्सी अ‍ॅड्रेस एंटर करा. सेव्ह करा. वर टॅप करा. कनेक्शन यशस्वी झाले तर तसे बरोबरच्या खुणेने दाखवले जाईल. तुम्ही प्रॉक्सी वापरून व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस पाठवू किंवा प्राप्त करू शकत नसल्यास तो प्रॉक्सी अ‍ॅड्रेस ब्लॉक केलेला असू शकतो. ब्लॉक केलेला प्रॉक्सी अ‍ॅड्रेस हटवण्यासाठी त्यावर जास्त वेळ प्रेस करा आणि पुन्हा प्रयत्न करण्यासाठी नवीन प्रॉक्सी अ‍ॅड्रेस एंटर करा.

याबद्दल सांगितले की, आम्हाला याची जाणीव आहे की असे अनेक लोक आहेत, ज्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांच्या जिवलग व्यक्तींपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रॉक्सी फीचर आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे इंटरनेट ब्लॉक झाल्यावर प्रॉक्सी सर्व्हरद्वारे कनेक्ट राहण्याचे फीचर रोलआऊट करीत आहे. जगभरातील वॉलंटियर्स आणि ऑर्गेनायजेशन्सच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कनेक्ट राहतील. प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट असतानाही युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील. असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com