Twitter Down For Thousands Of Users
तंत्रज्ञान
Twitter : आता तुम्ही 10,000 कॅरेक्टरमध्ये ट्विट करू शकता, टेक्स्ट फॉरमॅटिंगचा पर्यायही उपलब्ध असणार
एलॉन मस्क सतत ट्विटरमुळे चांगलेच चर्तेच आहेत.
एलॉन मस्क सतत ट्विटरमुळे चांगलेच चर्तेच आहेत. आता ट्विटरच्या कंटेंट पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या बदलानंतर आता ट्विटर यूजर्स 280 नव्हे तर 10,000 कॅरेक्टरमध्ये ट्विट करू शकतील. याशिवाय ट्विटरवर टेक्स्ट फॉरमॅटिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सेवा फक्त अशा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेतले आहे. लोकांना त्यांच्या भावना अधिक चांगल्या आणि स्पष्टपणे मांडता येतील.
Twitter ने म्हटले आहे, “आम्ही Twitter वर लेखन आणि वाचन अनुभव सुधारत आहोत! आजपासून, Twitter आता ठळक मजकूर 10,000 कॅरेक्टरमध्ये करु शकतो. नवीन वैशिष्ट्ये वापरण्यासाठी Twitter ब्लू साइन अप करणे आवश्यक आहे.