आता YouTube Shorts देखील पैसे कमावणार, YouTube ने आणला नवा पार्टनर प्रोग्राम

आता YouTube Shorts देखील पैसे कमावणार, YouTube ने आणला नवा पार्टनर प्रोग्राम

Tiktok या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर आता YouTube ने देखील कमाईची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणजेच आता यूट्यूब शॉर्ट्सवरही जाहिराती लावता येणार आहेत. याआधी यूट्यूबवर टिकटॉक सारख्या छोट्या व्हिडिओंचा ट्रेंड सुरू झाला होता. Tiktok मधील अनेक त्रुटींमुळे, भारत सरकारने 29 जून 2020 रोजी त्यावर बंदी घातली. टिकटॉकसोबतच अनेक चायनीज अॅप्सवरही देशात बंदी घालण्यात आली होती.

YouTube शॉर्ट्सवरील कमाई प्रक्रियेनंतर, YouTube वापरकर्त्यांना YouTube सोबत अधिक कमाई करण्याची संधी देखील मिळेल. युट्युबने याआधीच शॉर्ट्सचा फंडा जाहीर केला असला तरी. पण काही युट्युबर्सना याचा फायदा मिळत होता. आता युट्यूब पार्टनर कार्यक्रमांतर्गत शॉर्ट्स व्हिडिओ निर्मात्यांनाही लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, YouTube लवकरच त्याच्या शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट YouTube Shorts साठी पार्टनर प्रोग्राम सुरू करू शकते.

यूट्यूबसोबतच इंस्टाग्रामही शॉर्ट व्हिडीओ फॉरमॅटमध्ये सातत्याने बदल करत आहे. अलीकडे, इंस्टाग्राम देखील टिकटॉकचे फीचर कॉपी करण्यासाठी अडचणीत आले होते. इंस्टाग्रामने नवीन फीचर म्हणून फुल स्क्रीन व्हिडिओ फीड जारी केले होते, ज्यामुळे इंस्टाग्रामवर टिकटॉकचे फीचर कॉपी केल्याचा आरोप झाला होता.

आता YouTube Shorts देखील पैसे कमावणार, YouTube ने आणला नवा पार्टनर प्रोग्राम
आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरचे मेसेज एडिट करू शकणार आहात, हे फीचर करेल काम
Lokshahi
www.lokshahi.com