OPPO F21 Pro स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत किती असणार

OPPO F21 Pro स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत किती असणार

OPPO कंपनी भारतात त्यांच्या F सिरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. OPPO F21 Pro हा नवीन मोबाईल OPPO बाजारात घेऊन येत आहे. OPPO F21 Pro सीरिजमध्ये भारतात OPPO F21 Pro 4G आणि OPPO F21 Pro 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले जाणार आहेत.

बांगलादेशात OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह अगोदरच लाँच झाला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सोबत ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू मिळतो.

OPPO F21 Pro स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत किती असणार
उर्फी जावेदने चक्क सेफ्टी पिनने बनवलेला ड्रेस केले परिधान

OPPO F21 Pro 4G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश आणि 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह 600 नीट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला जाणार आहे. तसेच फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

OPPO F21 Pro 4G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच या ड्युअल सिम फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी मिळते. जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सह उपलब्ध आहे.

OPPO F21 Pro स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत किती असणार
मोटोरोला लाँच करणार iphone सारखा स्मार्टफोन; किंमत व फीचर्स जाणून घ्या

OPPO F21 Pro 4G ची किंमत

बांग्लादेशात OPPO F21 Pro 4G स्मार्टफोनचा एक 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेल लाँच झाला आहे. ज्याची किंमत 24,500 भारतीय रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या भारतात देखील याच किंमतीत हा फोन सादर केला जाऊ शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com