पेटीएमचे नवे 'Hide Payment' फीचर: ऑनलाईन व्यवहार आता गोपनीय ठेवता येणार
आजचे युग हे डिजिटल युगाचे आहे त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील बरीचशी कामे ही ऑनलाईन केली जातात. आजकाल लोकांची अनेक गोष्टींची खरेदी ऑनलाईन च केली जाते. आणि त्यासाठी ऑनलाईन पेमेंट हा पर्याय वापरला जातो. कोरोना नंतर तर कॅश देण्यापेक्षा लोक ऑनलाईन पेमेंट वर जास्त भर देताना दिसत आहेत. त्यामध्ये गुगल पे, फोन पे, भीम अँप , पेटीएम सारख्या अँपचा वापर केला जातो.त्यातीलच एक म्हणजे पेटीएमने 'Hide Payment' नावाचे एक नवीन फीचर लाँच केले आहे
आपण कोणतेही पेमेंट केले तर ते त्या अँपमध्ये दिसते. पण अनेकदा आपल्याला काही ऑनलाईन व्यवहार हे लपवून ठेवायचे असतात .यावर प्रभावी उपाय पेटीएमने (Paytm) शोधला आहे. 'Hide Payment' नावाच्या एक नवीन फीचरद्वारे तुम्ही तुमचे काही पेमेंट ची ट्रान्सेक्शन हिस्ट्री लपवू शकता, म्हणजेच हे व्यवहार आता इतरांच्या नजरेपासून लपलेले राहतील.त्याशिवाय आता तुम्ही QR विजेटच्या मदतीने पूर्वीपेक्षा जास्त वेगाने स्कॅन करून पेमेंट करू शकता.
याशिवाय, खात्यातील शिल्लक तपासणे देखील शक्य झाले आहे. इतकेच नाही तर, आता तुम्ही तुमच्या सर्व UPI व्यवहारांचे स्टेटमेंट PDF किंवा Excel स्वरूपात डाउनलोड करू शकता, ज्यामुळे खर्चाची माहिती ठेवणे आणखी सोपे होते.युझर्स च्या गोपनीयते साठी हा पर्याय खुप चांगला आहे. 'Hide Payment' द्वारे पेमेंट हिस्ट्रीपासून निवडक व्यवहार खाजगीरित्या आपण लपवू शकतो त्याच बरोबर कोणाला सरप्राईज गिफ्ट म्हणून जर पैसे पाठवत असाल किव्हा एखाद्याला गिफ्ट करताना, जेवणाचे बिल भरताना ते खाजगी राहावे यासाठी हे फिचर बेस्ट आहे. Hide Payment हे फीचर युजर्सना एका स्वाइपद्वारे visibility मॅनेज करण्यास मदत करते.डिझिटलायझजेशन च्या या युगात ग्राहकांना आपल्या ऍप द्वारे अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी हे नवे फिचर paytm ने बाजारात आणले आहे.