Pune Airport  5G +
Pune Airport 5G +Team Lokshahi

Pune Airport : पुणे एअरपोर्टवर 5G सेवा सुरु, देशातले पहिले एअरपोर्ट

पुण्यातील लोहगाव विमानतळावर गुरुवारी ( दि. 17 ) 5G प्लस सेवेला सुरुवात झाली आणि 5G सेवा देणारे देशातील पुणे पहिले विमानतळ ठरले आहे.

अमोल धर्माधिकारी : पुणे | पुण्यातील लोहगाव विमानतळावर गुरुवारी ( दि. 17 ) 5G प्लस सेवेला सुरुवात झाली आणि 5G सेवा देणारे देशातील पुणे पहिले विमानतळ ठरले आहे. एअरटेल कंपनीकडून हि सेवा सुरु करण्यात आली आहे. 5G स्मार्ट फोन असलेले सर्व ग्राहक त्यांच्या सध्याच्या डेटा प्लॅनवर या हाय स्पीड 5G प्लस इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकतात.

Pune Airport  5G +
Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

पुण्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळाच्या टर्मिनलवर हायस्पीड 5G प्लस सेवा मिळणार आहे. आगमन आणि प्रस्थान टर्मिनल्स, लाउंज, बोर्डिंग गेट्स, मायग्रेशन आणि इमिग्रेशन काउंटर, सुरक्षा क्षेत्रे, बॅगेज क्लेम बेल्ट्स, पार्किंग एरिया या ठिकाणी प्रवासी त्यांच्या मोबाईलवर जलद गतीच्या सेवेचा अनुभव घेणार आहेत.

Pune Airport  5G +
International Mens Day : 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन'; काय आहे या दिनाचं महत्त्व? वाचा काय आहे इतिहास

एअरटेल कंपनीने काही दिवसापूर्वी बेंगलोरमधील नवीन विमानतळ टर्मिनलवर 5 जी सेवांची घोषणा केली. एअरटेलची 5G सेवा सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानिपत आणि गुरुग्राम येथे उपलब्ध आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com