Samsung चा नवीन 5G फोन झाला सादर

Samsung चा नवीन 5G फोन झाला सादर

Published by :

सॅमसंगने आपला नवीन 5G स्मार्टफोन युरोपमध्ये सादर केला आहे. गेले कित्येक दिवस Samsung Galaxy A52s 5G चे लिक्स आणि बातम्या समोर होत्या. हा स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मॉडेल £410 (जवळपास 41,500 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत अजूनही गुलदस्त्यात आहे. हा फोन 3 सप्टेंबरपासून विकत घेता येईल. चला जाणून घेऊया Samsung Galaxy A52s 5G ची सविस्तर माहिती.

Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.

सॅमसंगने आपला हा फोन ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हा फोन IP67 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. ड्युअल मोड 5G आणि इतर बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com