Samsung Galaxy A23 5G
Samsung Galaxy A23 5GTeam Lokshahi

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आतापर्यंत लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनपेक्षा हा वेगळा आहे.

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आतापर्यंत लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनपेक्षा हा वेगळा आहे. Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. तसेच हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तर चला मग या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये 5.8-इंचाचा HD Plus (720×1,560 pixels) TFT डिस्प्ले देण्यात आले आहे. तसेच 4 GB रॅमही या स्मार्टफोन देण्यात आले आहे. Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोनमध्ये 64GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. तर Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 4000 mAh बॅटरीची क्षमता आहे.

Samsung Galaxy A23 5G
युट्यूबवरील व्हिडीओ डाउनलोड करायचाय; मग 'ही' घ्या सोपी पध्दत

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोनची किंमत जपानमध्ये 32,800 येन (सुमारे 19 हजार रुपये) आहे. तर हा स्मार्टफोन इतर मार्केटमध्ये उपलब्ध होणार याबद्दल अद्याप काही माहिती समोर आली नाही. तसेच हा स्मार्टफोन पांढरा, लाल आणि काळा अशा तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com