tata motor features
tata motor features team lokshahi

Tata चा धमाका; तीन SUV केल्या एकाच वेळी लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

टाटा हॅरियर आणि सफारी जेटची वैशिष्ट्ये खास
Published by :
Shubham Tate

Tata Nexon, Harrier and Safari Jet Edition : सणासुदीच्या निमित्ताने, कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन उत्पादने आणि ऑफर लाँच करतात. टाटा मोटर्सनेही याच योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी आपल्या नवीन SUV कार्स लाँच केल्या आहेत. टाटा मोटर्सने हॅरियर, सफारी आणि नेक्सॉनच्या जेट लाँच केल्या आहेत. जेट एडिशन आता या तीन कारचे टॉप व्हेरियंट असणार आहे. (tata motor launched nexon harrier and safari jet edition price and features)

नवीन व्हेरियंटमध्ये कारचा लूक तर बदलण्यात आला आहेच पण ती अधिक फीचर लोड करण्यात आली आहे. यामध्ये ब्राँझ बॉडी कलर आणि प्लॅटिनम सिल्व्हर रूफ देण्यात आले आहे. इंटीरियरला ड्युअल टोन कलर देखील मिळतात. याशिवाय तिन्ही कारच्या जेट एडिशनमध्ये जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

tata motor features
देशात कोणत्या राज्यात गणेशोत्सव साजरा होतो, काय आहे इतिहास

किंमत किती

Tata Nexon Jet Edition ची किंमत Rs 12.78 लाख पासून सुरू होते आणि Rs 13.43 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. टाटा हॅरियरची जेट एडिशन फक्त दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - XZ+ आणि XZA+. त्यांची किंमत 20.90 लाख रुपये आणि 22.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. टाटा सफारीच्या जेट एडिशनची किंमत 21.45 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22.65 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

टाटा नेक्सॉन जेट एडिशनची वैशिष्ट्ये

टाटा नेक्सॉनची जेट एडिशन मानक XZ प्रकारावर आधारित ठेवण्यात आली आहे. यामध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, ऑटो डिमिंग IRVM, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, टिल्ट फंक्शनसह इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो हेडलॅम्प्स, हरमन आणि iRA कनेक्टेड कार टेक कडून 7-इंच फ्लोटिंग डॅश-टॉप टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

tata motor features
Rahul Gandhi : राहुल गांधींना या मोठ्या नेत्याचा मिळाला पाठिंबा

यात दोन इंजिन पर्याय मिळतील - १.२-लिटर टर्बो पेट्रोल (१२० पीएस आणि १७० एनएम) आणि १.५-लिटर टर्बो डिझेल मोटर (११० पीएस आणि २६० एनएम). दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. Nexon ला तीन ड्राइव्ह मोड मिळतात - Eco, City आणि Sport.

टाटा हॅरियर आणि सफारी जेटची वैशिष्ट्ये

केबिनचा अनुभव सुधारण्यासाठी, दोन्ही वाहनांच्या जेट एडिशनमध्ये वायरलेस चार्जिंग, नवीन लेदर सीट्स, ऑटो डिमिंग ORVM, पॅनिक ब्रेकिंग अलर्ट, ब्लॅक कलर डायमंड कट अॅलॉय, ड्रायव्हर आणि को-ड्राइव्हसाठी हवेशीर सीट्स मिळतात. यामध्ये एअर प्युरिफायर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, iRA कनेक्टेड कार टेक, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 8.8-इंचाचा डिस्प्ले यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. दोन्ही वाहनांच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com