Mobile Users : पोस्टपेड ते प्रीपेड स्विच 30 दिवसांत शक्य

Mobile Users : पोस्टपेड ते प्रीपेड स्विच 30 दिवसांत शक्य

मोबाईल सेवेत बदल आता जलद, 30 दिवसांत स्विचची सुविधा
Published by :
Shamal Sawant
Published on

भारतीय दूरसंचार विभागाने (DoT) सिमकार्ड संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यानुसार आता पोस्टपेडवरून प्रीपेड किंवा प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि जलद झाले आहे. या निर्णयामुळे लाखो मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.

पूर्वी वापरकर्त्यांना एकदा सिम कार्ड एक्टिव केल्यावर 90 दिवसांचा ‘कूलिंग पीरियड’ पूर्ण केल्याशिवाय सेवा प्रकारात (प्रीपेड ते पोस्टपेड किंवा त्या उलट) बदल करता येत नव्हता. मात्र, आता हा कालावधी 30 दिवसांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच, जर एखाद्याने नवीन सिम घेतले आणि काही दिवस वापरल्यानंतर सेवा प्रकार/कंपनी बदलायचा निर्णय घेतला, तर तो आता एका महिन्यातच शक्य आहे.

अर्थात, हा बदल पहिल्यांदा स्विच करणाऱ्यांसाठी लागू आहे. नेहमीच सेवा प्रकार बदलणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र 90 दिवसांचा कालावधी बंधनकारक असेल. नवीन प्रणाली अंतर्गत ओटीपीच्या माध्यमातून स्विच प्रक्रिया पूर्ण होणार असून, ग्राहकांना केवायसीसाठी अधिकृत टेलिकॉम स्टोअरमध्ये जावे लागेल.

ग्राहक अनेकवेळा विविध कारणांमुळे सेवा बदलतात त्याची कारणेही अनेक असतात ज्यामध्ये योजना महाग वाटणे, रिचार्ज वेळेवर न होणे, नेटवर्क किंवा कस्टमर सपोर्टबाबत असमाधान वाटणे. आता हा बदल झाल्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार सेवादाते कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

हा निर्णय मोबाईल युजर्सच्या दैनंदिन वापराचा विचार करता स्वागतार्ह ठरणार आहे. कारण मोबाईल हे आजच्या जीवनशैलीतील अत्यावश्यक साधन बनले आहे आणि वापरकर्त्यांच्या सोयीसाठी असा निर्णय आवश्यकच होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com