TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार!

TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार!

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क | केंद्र सरकारने गतवर्षी संपूर्ण देशभरात शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉकसह इतर चायनिय अ‍ॅप्सवर बंदी आणली होती.

ही बंदी सुरुच राहणार असल्याची नोटीस इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मिनिस्ट्रीने ब्लॉक्ड अ‍ॅप्सच्या उत्तरांची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेत नोटीस पाठवली आहे.सरकारने नोटीस पाठवल्यानंतर टिकटॉकच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही नोटिशीचे मूल्यांकन करत असून त्यानंतर उत्तर देऊ. भारत सरकारकडून 29 जून 2020 ला जारी केलेल्या निर्देशांचे पालन करणारी टिकटॉक पहिल्या कंपन्यांपैकी एक होती.

आम्ही सतत स्थानिय कायदे आणि नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारच्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत.आमच्या सर्व युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे टिकटॉकने सांगितले.दरम्यान, 59 अ‍ॅप्सनंतर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पुन्हा 118 इतर अ‍ॅप्सवरही बंदी घातली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com