Spam Calls: स्पॅम कॉल्सवर लगाम लावण्यात अपयश; ट्रायने जिओ, एअरटेल आणि VI ला १५० कोटींचा दणका
देशात वाढत्या स्पॅम कॉल आणि मेसेजेसना आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला एकूण १५० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०२० ते २०२३ दरम्यान नियमांचे पालन न केल्याबद्दल हा दंड आहे.
ट्रायनुसार, ऑपरेटर्सनी स्पॅमर्सविरुद्ध वेळेवर कारवाई केली नाही आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण चुकीच्या पद्धतीने केले. ईटी टेलिकॉम अहवालानुसार, अनेक प्रकरणांत तक्रारी फेटाळून लावल्या गेल्या. प्रत्येक सेवा क्षेत्रासाठी दरमहा ५ दशलक्ष रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा नियम असल्याने हा निर्णय झाला.

ग्राहकांच्या सोयीसाठी ट्रायने DND अॅप लाँच केले, ज्यात ४ ते ६ क्लिकमध्ये तक्रार करता येते. तक्राराची मुदत ३ वरून ७ दिवसांपर्यंत वाढवली असून, १० दिवसांत ५ तक्रारींवर कारवाई होईल. बँकिंग, विमा संस्थांसाठी १६०० सिरीज अनिवार्य, तर सरकारी संस्थांनाही ती वापरावी लागेल. १०-अंकी मोबाइल नंबरवरून प्रमोशनल कॉल बंद. या कडक नियमांमुळे स्पॅमला खरंच आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.