Tweet Deck : आता Tweet Deck वापरण्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे

Tweet Deck : आता Tweet Deck वापरण्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे

तुम्ही जर TweetDeck वापरत असाल तर आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

तुम्ही जर TweetDeck वापरत असाल तर आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याच्याआधी एलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलला. ट्विटर बर्ड लोगो बदलून ब्लू बर्डच्या जागी "X" असा लोगो केला. आतापर्यंत TweetDeck सेवा मोफत देण्यात येत होती.

Twitter ने TweetDeck चे नाव बदलून X Pro केले आहे. तुम्हाला हे फिचर वापरण्याकरता दर वर्षाला 6,800 रुपये द्यावे लागणार आहेत.तुम्हाला वार्षिक 12 टक्के सूट मिळू शकते.

या अॅप्लिकेशनमधून तुम्ही एकाच वेळी अनेक खाती ऑपरेट करु शकता. तसेच इतर लोकांच्या अकाऊंटवर लक्ष ठेवू शकता.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com