एलोन मस्क
एलोन मस्क टिम लोकशाही

ट्विटरने तब्बल 90 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

एलोन मस्कने जेव्हापासुन ट्विटरचे सुत्र हाती घेतले तेव्हापासुन त्यानी कर्मचारी कपातीवर भर दिले.

एलन मस्क यांनी ट्वीटर जेव्हा पासून खरेदी केलंय तेव्हा पासून त्यांनी एक एक धक्कादायक निर्णय घ्यायला सुरवात केली आहे. कंपनीचा जवळपास 50 % लोकांना मस्कनी नारळ दिला आहे. यात भारतातील 200 हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता भारतात ट्विटरचे अवघे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी राहिले आहेत.

कंपनीच्या इंजीनियरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील कर्मचाऱ्यांना कपात करण्यात येत आहे. ट्विटर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटविल्याचे ई-मेल्स आले आहे. या आधी गुरूवारी कंपनीने इमेलद्वारे कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी न येण्यास सांगितले होते. या मेलमध्ये म्हटले होते की, "जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसमध्ये येण्यासाठी रस्त्यात असाल तर परत घरी जा".

मस्क यांनी स्पष्टीकरण देणारे ट्विट केले त्यांनी म्हटले की, "कंपनीला दररोज 40 लाख डॉलर नुकसान होत आहे. त्यामुळे आमच्याकडे कर्मचार्यांना हटवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ज्यांना काढले गेले आहे, त्यांना 3 महिने सेव्हरन्स दिला गेला आहे. कायदेशीरदृष्ट्या दिल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम 50 टक्के जास्त आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com