ट्विटर हँडलचा बदलला लोगो; पक्षीऐवजी दिसणार 'हे' चिन्ह

ट्विटर हँडलचा बदलला लोगो; पक्षीऐवजी दिसणार 'हे' चिन्ह

ट्विटर आता X म्हणून ओळखले जाणार आहे. यासोबतच ट्विटरच्या अधिकृत हँडलवरचाही (@Twitter) लोगो बदलण्यात आला आहे. यासोबतच नाव बदलून X असे करण्यात आले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

ट्विटर आता X म्हणून ओळखले जाणार आहे. यासोबतच ट्विटरच्या अधिकृत हँडलवरचाही (@Twitter) लोगो बदलण्यात आला आहे. यासोबतच नाव बदलून X असे करण्यात आले आहे. मात्र, मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर फक्त जुना लोगो दिसत आहे. ट्विटरच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी ट्विट करून एक्स नावाची माहिती दिली. जुन्या लोगोमध्ये निळ्या रंगाचा पक्षी वापरण्यात आला होता.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करण्यात आले आहेत. पण नाव आणि लोगो बदलणे हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय आहे. लिंडा याकारिनो यांनी ट्विटमध्ये कॅमेराप्रमाणे एक्स असे म्हंटले आहे. यासोबतच त्यांनी इमारतीवरील एक्स लोगोचा उल्लेख केला.

या वर्षी एप्रिलमध्ये, एलोन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यांचे स्वागत करताना मस्क यांनी ट्विट केले की, ते या प्लॅटफॉर्मचे X, एव्हरीथिंग अ‍ॅपमध्ये रूपांतर करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. मस्कने X प्लॅटफॉर्मबाबत मोठी तयारी केली आहे आणि आणखी अनेक सेवाही देण्यात येणार आहेत.

दरम्यान, एलन मस्कचे एक्स कॅरेक्टरवर जुने प्रेम आहे. एलॉन मस्कची स्पेस एक्स नावाची कंपनी देखील आहे. या वर्षी एप्रिलमध्येच ट्विटरने आपल्या पार्टनरसोबत अधिकृत डीलसाठी एक्स कॉर्पचे नाव वापरले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com