Upcoming Cars April-May 2025 : एप्रिल-मे महिन्यात भारतात EV पासून लक्झरी SUV पर्यंत अनेक नव्या कार्स होणार लाँच

Upcoming Cars April-May 2025 : एप्रिल-मे महिन्यात भारतात EV पासून लक्झरी SUV पर्यंत अनेक नव्या कार्स होणार लाँच

कार लाँच 2025: एप्रिल-मे महिन्यात भारतात Tata Curvv EV, Maruti eVX, Mahindra XUV.e8, Hyundai Creta Facelift, BMW i5, Kia Carens Facelift सादर होणार.
Published by :
Team Lokshahi
Published on

1. Tata Curvv EV – फ्युचरिस्टिक डिझाईनसह इलेक्ट्रिक SUV

टाटा मोटर्सने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक SUV 'Curvv EV' कारला सादर करण्याची तयारी केली आहे. या कार आकर्षक शैलीने डिझाईन, सुमारे ५०० किमी पर्यंतची सिंगल चार्ज रेंज, आणि टाटाची विशिष्ट Ziptron टेक्नोलॉजी ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये असतील. ही SUV शहरातील तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य ठरेल.

2. Maruti eVX – मारुतीचं इलेक्ट्रिक युगातलं पाऊल

भारतातील सर्वात जुने कार निर्माते मारुती सुझुकी हे , त्यांच्या पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV 'eVX' च्या लाँचसाठी सज्ज आहे. दीर्घ बॅटरी रेंज, सुरक्षित ड्रायव्हिंग फीचर्स आणि भारतीय रस्त्यांसाठी योग्य ग्राउंड क्लीयरन्स आहे. यामुळे ही कार मध्यमवर्गीयांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.

3. Mahindra XUV.e8 – इलेक्ट्रिक SUV चा नवाकोरा अनुभव

महिंद्राने त्यांच्या प्रसिद्ध XUV700 मॉडेलच्या इलेक्ट्रिक व्हर्जनवर आधारित 'XUV.e8' आणण्याची तयारी केली आहे. यात प्रगत डिजिटल डॅशबोर्ड, अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS),आणि आधुनिक इंटीरियर यांचा समावेश आहे. ही कार घरगुती वापरासोबतच व्यावसायिक वर्गालाही भुरळ घालू शकते.

4. Hyundai Creta Facelift – रुप नवे, विश्वास जुना

हुंडईची लोकप्रिय SUV 'Creta' आता नव्या डिझाईन आणि अपग्रेडेड फीचर्ससह येणार आहे. यात ADAS, नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आणि अद्ययावत सुरक्षा सुविधा असतील. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांत ही SUV उपलब्ध असेल. त्यामुळे पारंपरिक इंजिनप्रेमींना देखील हा पर्याय आकर्षक वाटू शकतो.

5. BMW i5 – लक्झरी आणि इलेक्ट्रिक सिस्टिम याचा मिलाफ

ज्यांना प्रीमियम अनुभव हवा आहे त्यांच्यासाठी BMW 'i5' ही एक उत्तम निवड ठरणार आहे. पॉवरफुल परफॉर्मन्स, सुसज्ज इंटीरियर आणि टिकाऊ इलेक्ट्रिक तंत्रज्ञान हे या लक्झरी सेदानचे मुख्य आकर्षण ठरेल. हाय-एंड सेगमेंटमध्ये ही कार नव्या स्टँडर्ड्स सेट करू शकते.

6. Kia Carens Facelift – फॅमिली गाडीतला नवा टच

किया मोटर्सची लोकप्रिय एमपीव्ही 'Carens' आता फेसलिफ्ट अवतारात येत आहे. मोठ्या कुटुंबासाठी आदर्श असलेली ही कार आता अधिक आरामदायक आणि स्टायलिश बनणार आहे. नवीन एक्सटेरियर डिझाईन, अपडेटेड केबिन आणि सुरक्षिततेसाठी दिलेले नविन फीचर्स ही याची बलस्थाने असतील.

एकूणच कायम तर एप्रिल व मे २०२५ मध्ये भारतीय ग्राहकांसाठी वाहन निवडताना अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांच्या इलेक्ट्रिक वाहनांकडे झुकणाऱ्या प्रवृत्तीमुळे इलेक्ट्रॉनिक (EVs) गाड्यांची मागणी वाढली आहे, तर SUV आणि लक्झरी सेगमेंटमध्येही स्पर्धा तीव्र झाली आहे. कार खरेदीचा विचार करत असाल, तर या नव्या लाँचेसकडे एक नजर टाकणे नक्कीच फायदेशीर ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com