Google Pay
Google PayTeam Lokshahi

भारी! 'गुगल पे' वर आता क्रेडिट कार्डमार्फत करता येणार UPIपेमेंट

गुगल पेच्या या नव्या सुविधेमुळे आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी क्रेडिट कार्ड घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही.
Published by :
Sagar Pradhan

सध्या कुठेही गेलात तर सर्रास ऑनलाईन पेमेंटचा वापर होताना दिसत आहे. त्यातच दिवसांदिवस युपीआयचा वापर वाढताना दिसत आहे. पाणीपुरीच्या गाडीपासून ते मोठ्या वस्तूंच्या दुकानापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा उपयोग होताना दिसतो. त्यातच आता याच गोष्टीचा विचार करून GPayने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सेवा लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. गूगल पे वर आता तुम्ही क्रेडिट कार्ड सिलेक्ट करुन UPI पेमेंट करु शकणार आहेत. आता वापरकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी क्रेडिट कार्ड सोबत ठेवण्याची गरज पडणार नाही.

GPayवर रुपे क्रेडिट कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घ्या

- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर GPay उघडा.

- GPay होम पेजच्या वरच्या कोपर्‍यात दिसणार्‍या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

- या विंडोमध्ये तुम्हाला बँक खाते, रुपे क्रेडिट कार्ड आणि पे व्यवसाय पर्याय दिसेल.

- तुम्हाला RuPay क्रेडिट कार्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल.

- यानंतर तुमच्यासमोर अनेक बँक पर्याय दिसतील.

- तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव निवडावे लागेल ज्याने तुम्हाला क्रेडिट कार्ड जारी केले आहे.

- आता तुम्हाला कार्डचे शेवटचे ६ अंक, कार्डची एक्सपायरी आणि पिन असे काही तपशील टाकावे लागतील. यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड GPay शी लिंक केले जाईल.

अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्हाला UPI पेमेंट करायचे असेल, तेव्हा तुम्ही Google Pay वर जाऊन RuPay क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता.

भारतात इतके करोडो लोक करतात ऑनलाइन पेमेंट

एका अहवालानुसार, भारतात 400 दशलक्षाहून अधिक लोक डिजिटल पद्धतीने व्यवहार करतात. भारतात, किराणा, खाद्यपदार्थ वितरण आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रातील 80 टक्क्यांहून अधिक व्यवहार ऑनलाइन केले जातात. अहवालात असेही म्हटले आहे की PhonePe, Google Pay, Paytm आणि Cred यांचा UPI-आधारित पेमेंटमध्ये 95 टक्क्यांहून अधिक मार्केट शेअर आहे. "डिजिटल पेमेंट मार्केट सध्याच्या 3,200 लाख कोटी रुपयांवरून FY2026 पर्यंत 4,000 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे," असे एका अहवालात म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com