तंत्रज्ञान
‘या’ कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लवकरच येणार
स्मार्टफोन निर्माता विवो कंपनी Vivo Nex 3S 5G Phone नंतर आता Vivo NEX 5 हा स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह बाजारात येईल, याची माहितीदेखील मिळाली आहे.
या सीरिजच्यानंतर सब-ब्रँड iQOO अंतर्गत iQOO 9 सीरीज लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये देखील क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो. शाओमी आणि सॅमसंगदेखील या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरचा वापर आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये करणार आहेत.
सॅमसंग या प्रोसेसरसह Galaxy S22 सीरिज सादर करू शकते. तर Xiaomi 12 स्मार्टफोन या पॉवरफुल चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.दरम्यान, कोणत्याही कंपनीने याची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे Vivo NEX 5 च्या अचूक स्पेक्ससाठी आपल्याला फोनच्या लाँचची वाट बघावी लागणार आहे.