VIVO चा नवा Vivo X60t 5G फोन लाँच
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी VIVO ने गेल्या वर्षी Vivo X60t हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo X60 स्मार्टफोन Snapdragon 870 SoC प्रोसेसरने सुसज्ज आहे. Vivo X60t च्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास हा फोन चीनमध्ये 3,498 चीनी युआन (जवळपास 39,000 रुपये) इतक्या किंमतीसह लाँच करण्यात आला आहे.
Vivo X60t चे स्पेसिफिकेशन्स
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड OriginOS 1.0 वर चालतो. या ड्युअल नॅनो सिम स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा फुल एचडी + (1,080 × 2,376 पिक्सेल) सेंटर्ड पंच होल AMOLED डिस्प्ले आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशियो 19.8 : 9 असा आहे. Vivo X60t मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, जो OIS सह 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह सादर करण्यात आला आहे. यात 2 एक्स टेलिफोटो लेन्ससह 13 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 120 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह 13 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. या सेटअपचे मुख्य आकर्षण म्हणजे ZEISS ऑप्टिक्स आणि ट्यूनिंग. तसेच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंट पंच होलवर 32 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
या फोनचे वजन 177 ग्रॅम इतके आहे. या डिव्हाइसवरील व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे उजव्या बाजूला वरच्या बाजूस आहेत. याशिवाय फोनमध्ये स्पीकर ग्रिल, यूएसबी-सी पोर्ट आणि ड्युअल सिम स्लॉट आहेत. बेझेल्स, कर्व्ड स्क्रीन आणि डिस्प्लेच्या वरच्या बाजूला देण्यात आलेल्या पंच होल डिझाईनमुळे फोनला अधिक आकर्षक लुक मिळाला आहे. या फोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर फोनमध्ये एमोलेड पॅनेलसह 6.56 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120 हर्ट्ज इतका आहे, जो फुल एचडी प्लस रेझोल्यूशन देतो.
या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही भर उन्हातही हा फोन वापरत असाल तरी या फोनची स्क्रीन स्पष्ट दिसते. फोनच्या पॅनेलमध्ये 800 निट्स अधिक ब्राइटनेस आहे. या फोनच्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये एफ/1.48 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, एफ/2.2 अपर्चरचा 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि एफ/2.46 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा 2 एक्स टेलिफोटो शूटर कॅमेरासुद्धा आहे.