WhatsApp
WhatsAppTeam Lokshahi

Whatsapp घेऊन आले तुमच्या कामाचं नवं फीचर्स; होणार अनेक फायदे

व्हॉट्अॅप लवकरच एक नवे फीचर रोल आउट करणार आहे.
Published by :
shamal ghanekar

सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग App अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप (whatsapp). फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, फाइल्स, व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल अशा अनेक गोष्टींसाठी हा अ‍ॅप वापरता येतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी नवीन फीचर्स वापरत्याकर्त्यांसाठी घेऊन येत असते. अगदी ऑफिसच काम असलं तरी ते व्हॉट्सअ‍ॅपवरून केलं जाते. यामुळे सर्वाधिक व्हॉट्सअ‍ॅप वापरले जाते. पण जेव्हा फोन बदलला जातो तेव्हा महत्त्वाचा डेटा सेव्ह करायचा असतो त्यावेळी अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे या अडचणींचा सामना सतत वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी व्हॉट्अॅप लवकरच एक नवे फीचर रोल आउट करणार आहे.

लवकरचच व्हॉटसअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स घेऊन येत आहे. त्या फीचर्सचे नाव ‘चॅट ट्रान्सफर’ असे आहे. वापरकर्ते एका अँड्रॉइड डिवाइसमधून दुसऱ्या अँड्रॉइड डिवाइसमध्ये सहज डेटा अपलोड करू शकणार आहेत.

WhatsApp
WhatsApp Community वर असा करा नवीन ग्रुप तयार

या फीचर्सवर काम चालू असून हे फीचर्स लवकर उपलब्ध करून देणार असल्याची माहिती ‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’ने दिली आहे. वापरकर्ते या फीचर्सचा सहजरित्या डेटा ट्रान्सफर करू शकणार आहेत. त्यामुळे आता वापरकर्ते या नवीन फीचर्सची आतुरतेने वाट पाहत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com