50MP चा शानदार कॅमेरा असलेला ‘हा’ स्वस्त फोन येतोय भारतात

50MP चा शानदार कॅमेरा असलेला ‘हा’ स्वस्त फोन येतोय भारतात

Published by :
Published on

मुंबई | Xiaomi नं आपली 'रेडमी नोट 11' सीरीज चीनमध्ये सादर केली आहे. या सीरिजमध्ये तीन 5G Phone सादर केल्यानंतर कंपनीनं Redmi Note 11 4G लाँच केला होता. आता हा स्वस्त फोन भारतीय बाजारात येणार आहे. हा फोन जागतिक बाजारात 6GB RAM, 5000mAh Battery, 90Hz Refresh Rate आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. शाओमी भारतात Redmi Note 11 4G फोन सादर करणार आहे.

स्पेसिफिकेशन :

Redmi Note 11 4G मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एलसीडी डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन, 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.

या फोनला मीडियाटेक हीलियो जी 88 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर माली जी 52 जीपीयू मिळतो. 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह येणारा रेडमी फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.

फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते.

Redmi Note 11 4G मधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये 3.5 एमएम जॅक, आयआर ब्लास्टर आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.दरम्यान, या डिवाइसमधील 5,000 एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग आणि 9वॉट रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
स्मार्टफोनच्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 युआन म्हणजेच 11,600 रुपये)तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1099 युआन म्हणजे 12,800 रुपये मोजावे लागतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com