Business
तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीय शेअरबाजाराचे कामकाज ठप्प!
राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) तांत्रिक अडचण आल्याने कामकाज ठप्प झाले आहे. मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने सकाळासूनच इंडेक्स अपडेट होत नसल्याचे समोर आले आहे.
शेअर बाजाराची आकडेवारी आणि माहिती व्यावसायिक आणि गुंतवणुकदारांना दाखविण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराकडून टेलिकॉम कंपन्यांची सेवा घेतली जाते. या सेवेच्या लिंकमध्ये तांत्रिक अडचण आली आहे. त्यामुळे एनएसई अपडेट होणे थांबले आहे. परिणामी एनएसईने फ्यूचर अॅण्ड ऑप्शनमधील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. याशिवाय रोखीचे सौदे देखील थांबविण्यात आले आहेत. तथापि, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये व्यवहार सुरळीत सुरू आहेत,