नियम मोडून भंडाऱ्यात धूमधडाक्यात लग्न, तहसीलदारांनी ठोठावला दंड

नियम मोडून भंडाऱ्यात धूमधडाक्यात लग्न, तहसीलदारांनी ठोठावला दंड

Published by :
Published on

शासन-प्रशासनाकडून कोरोना नियमाचे पालन करत आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्याबाबत कितीही ओरड होत असली तरी ग्रामीण भागात कोरोना नियमाला सपशेल तिलांजली दिली जात असल्याच्या प्रकार उघड़ झाला असून कोरोना नियमाची पायमल्ली करत मोठ्या संख्येने लोकांना बोलावून लग्न सोहळा साजरा करने एका आयोजकाला चांगले महागात पड़ले आहे. अश्या आयोजकावर भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी १० हजार रुपयांचा दंड ठोठावत तो वसूल ही केला आहे.

भंडारा शहरालगत ठाना गावातील बावनकुले सभागृहात हा प्रकार घडला आहे. ह्या ठिकाणी आयोजित लग्नात जवळ जवळ १५० पेक्षा अधिक लोक उपस्थित असून या ठिकाणी कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचे निदर्शनात आल्यावर तहसीलदार अक्षय पोयाम यांनी हा दंड ठोठावला आहे. व परत असा प्रकार घडल्यास सभागृह सील करण्याची तंबी ही सभागृह मालकास देण्यात आली आहे. यावेळी उपविभागिय अधिकारी राठौड़ ही उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com