MNS Deepostav Raj Thackeray: ठाकरे गटाची आयोगाकडे तक्रार, कंदीलावर मनसेचे चिन्ह आणि पक्षाच नाव

शिवाजी पार्क येथे मनसेने दिपोत्सवाकरीता लावलेले कंदील अखेर पालिकेने आता खाली उतरवलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला आक्षेप घेतलेला होता.
Published by :
Team Lokshahi

शिवाजी पार्क येथे मनसेने दिपोत्सवाकरीता लावलेले कंदील अखेर पालिकेने आता खाली उतरवलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला आक्षेप घेतलेला होता. निवडणुक आयोगाला या संदर्भात तक्रार देखील केली होती. या तक्रारीनंतर शिवाजी पार्कमध्ये लावलेले मनसे तर्फे लावण्यात आलेले कंदील हे काढण्यात आलेले आहेत.

दिपोत्सवाकरीता मनसेकडून रोशनाई पाहायला मिळते मात्र यावेळी मनसेकडून लावण्यात आलेल्या कंदीलावर पक्षाचं चिन्ह देखील होतं त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावर आक्षेप करण्यात आला होता. शिवसेना ठकरे गटाचे अनिल देसाई यांनी याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. याची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली होती आणि त्यामुळे आता हे कंदील उतरवण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com