India
हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये २२ लाख लोकांचे पहिलं शाही स्नान संपन्न
महाशिवरात्री हा दिवस हिंदू भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये पहिलं शाही स्नान पार पडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारच्या कुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांना कोरोना चाचणी अनिर्वाय करण्यात आली आहे.दक्षता म्हणून उत्तराखंडाच्या सीमांवर कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्पवर तपासणी करुनच भाविकांना आत सोडले जात आहे.
हरिद्वारमधल्या 'हर की पौंडी' ब्रह्मकुडांवर सकाळी ९ वाजेपर्यंत २२ लाख लोकांचे शाही स्नान संपन्न झाले आहे. यावेळी जुना आखाडा, आव्हान आखाडा, अग्नि आखाडा आणि किन्नर आखाडा स्नानासाठी उतरले होते. तर निरंजनी आखाडा आणि आनंदी आखाडा दुपारी १ वाजता स्नानासाठी उतरले होते. त्यानंतर महानिर्वाणी आखाडा आणि अटल आखाडा दुपारी ४ वाजता स्नान संपन्न झाले आहे.