The Sabarmati Report Reviews: 2002 च्या गुजरातमधील सत्यघटनेवर आधारित; कसा आहे 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट'?
Reviews(4.5 / 5)
15 नोव्हेंबरला विक्रांत मेसीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट रिलीज झाला. 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकामुळे अनेक राजकीयवर्तुळात वादविवाद निर्माण झाले तरी देखील हा चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने आतापर्यंत 35.59 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाची कथा ही 27 फेब्रुवारी 2002मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ घटनेची झलक दर्शवते.
या रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसला अयोध्येवरून परतत असताना भीषण आग लागवण्यात आली होती आणि 59 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. या घटने दरम्यान गुजरातमध्ये भीषण दंगल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती. याच सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे.
चित्रपटातले कलाकार आणि पात्र: धीरज सरना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात विक्रांत मेस्सी समर कुमार या मुख्य भूमिकेत असून त्याने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तर राशी खन्ना अमृता गिल या भूमिकात आणि रिद्धी डोंगरा मनिका राजपुरोहित न्यूज अँकर आहे जिचा मीडियावर दबदबा आहे, या भूमिकेत पाहायला मिळाली आहे. समर कुमारच्या भूमिकेत विक्रांत मॅसीने उत्कृष्ट काम केले आहे.
चित्रपटाची कथा: 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात एका धाडसी आणि मीडियाची भूमिका दर्शविली आहे. समर कुमार हा चित्रपटाचे बीट कव्हर करणारा पत्रकार आहे. साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला आगा लावली जाते ही बातमी कव्हर करण्यासाठी मनिका गोध्राला जाते आणि समरला कॅमेरा मॅन म्हणून सोबत घेऊन जाते. परंतू मनिका तिच्या बॉसच्या सांगण्यावरून लोकांसमोर खोटा अहवाल सादर करते, मात्र समर सत्य उघड करण्यासाठी तो आपला अहवाल तयार करतो, यामुळे चॅनला बॉस त्याला कामावरून काढतो आणि त्याच्यावर कॅमेरा चोरीचा आरोप लावून त्याला तुरुंगातही पाठवले जाते. मात्र समरच्या रिपोर्टचा व्हिडिओ अमृताला मिळतो आणि तो तिला तिच्यासोबत गोध्रा येथे घेऊन जाण्यास पटवतो. अशा प्रकारे, ते एकत्रितपणे गोध्रा घटनेच्या सत्यापर्यंत पोहोचतात आणि त्या निष्पाप 59 लोकांवर घडलेली घटना जगासमोर आणतात.
चित्रपटाचा रिव्ह्यू: 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात एका धाडसी आणि मीडियाची भूमिका दर्शविली आहे. पत्रकारिता राजकारण आणि जनमत यांना कशी छेदते याचे एक दृश्य मांडून प्रसारमाध्यमांची निर्भीडपणे विषयापर्यंत पोहचून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतो. समरचे जीवन संघर्षांनी व्यापलेले दाखवले आहे. या चित्रपटाने एक सत्यघटना जी बहुतेक लोकांना माहित असेल ती चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. त्यामुळे याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तर समर कुमारच्या भूमिकेत विक्रांत मॅसीने उत्कृष्ट काम केले आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यू 4.5 इतका आहे.