India
भारतीय लसीच्या प्रभावावर अमेरिकेचा विश्वास नाही?
अमेरिकेने भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या व्यक्तींना पुन्हा एकदा दुसऱ्या व्हॅक्सिनचा डोस घेण्यास सांगितले आहे. भारताची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसींचा डोस घेणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य संघटेने अजूनही या लशींच्या वापराला परवानगी दिलेली नाही. यावर भारत बायोटेकनं असं म्हटलं आहे, की कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून जुलै-सप्टेंबरपर्यंत आपात्कालीन वापरास परवानगी मिळेल, अशी आशा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे, की आपात्कालीन वापराच्या सूचीमध्ये कोव्हॅक्सिनला सामील करण्यासाठी भारत बायोटेककडून आणखी अधिक माहिती प्राप्त होण्याची गरज आहे.