३०० युनिट वीज मोफत देणार, केजरीवालांचं ‘मिशन पंजाब’
पुढच्या वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजपाबरोबर आम आदमी पक्षानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या चंदीगढ भेटीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी मोठी घोषणा केली. पंजाबमध्ये 'आप'ची सत्ता आल्यास प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. तसंच पूर्वीचं सर्व वीजबिल माफ केलं जाईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.
पंजाबची सत्ता मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी मोफत वीज हे आपले हत्यार वापरले आहे. हेच तेच शस्त्र आहे ज्याने त्यांनी दिल्लीची सत्ता मिळविली आहे. २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल दिल्लीत वीज बिलाच्या मुद्द्यावरून खूप लोकप्रिय झाले. स्वत: लोकांच्या घरोघरी जाऊन वीज ते जोडत होते. परिणामी त्यांचे सरकार सत्तेत आले. आता पंजाबमध्येही केजरीवाल दिल्लीचे सारखाच वीज मुक्त फॉर्म्युला घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहेत.