Gold Rate : पाहा सोन्या चांदीचे आजचे दर
शुक्रवारी संध्याकाळी मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून सोन्याचे भाव वाढलेले होते, ते गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाले. शुक्रवारी सोन्याचा भाव हा ४५ हजार ५०० रुपये इतका होता तर आज सोन्याच्या भावात १००० रुपयांनी वाढ होऊन आजचा सोन्याचा भाव हा ४६ हजार ५०० इतका झाला आहे. सध्या सुरु झालेल्या लग्न सराईमुळे सोने खरेदीत हि भाव वाढ झाली असल्याची माहिती मिळते.
तर चांदीच्या दरात १४०० रुपयांची वाढ झाली असून गुरुवारी हा दर ६३६०० इतका होता. तर आता पासून एक किलो चांदी साठी तब्बल ६५००० रुपय मोजावे लागणार आहेत .गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार होतं असल्याचं पाहायला मिळतंय.
अजूनही सोन्याची दर तुलना भारतामध्ये बरेच कमी आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांची खरेदी वाढण्याची शक्यता आहे. भारतात काही महिन्यान पूर्वी सोन्याचे दर ५८ हजार वादळे होते पण, परिस्तिथी सुधारू लागल्यानंतर सोन्या आणि चांदीचा दारात बरीच घट झाली असल्यामुळे. सध्याचा काळात सोन्याची खरेदी करने योग्य समजले जाते आहे.

