ट्रॅक्टरद्वारे गाझीपूर बॉर्डरवर जाऊन झेंडा फडकवणार

ट्रॅक्टरद्वारे गाझीपूर बॉर्डरवर जाऊन झेंडा फडकवणार

Published by :
Published on

भारतीय किसान यूनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी हरियाणाच्या जिंदमधील शेतकऱ्यांकडून स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीचं समर्थन केलं आहे. ट्रॅक्टरद्वारे गाझीपूर बॉर्डरवर जाऊन १५ ऑगस्टला झेंडा फडकवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही १४ व १५ ऑगस्ट रोजी ट्रॅक्टरद्वारे गाझीपूर बॉर्डरवर जाऊ आणि १५ ऑगस्टला झेंडा फडकवू. दोन जिल्ह्यांमधून ट्रॅक्टर जातील, असं सांगून त्यांनी २६ जानेवारी रोजी आम्ही राष्ट्रीय ध्वज हटवला नव्हता, असं देखील राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.संयुक्त किसान मोर्चाने उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पंजाब व देशातील अन्य भागांमध्ये जाऊन सरकारची धोरणं आणि काम यावर शेतकऱ्यांशी बोलणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ५ सप्टेंबर रोजी मुजफ्फरनगर(उत्तरप्रदेश) येथे महापंचायत होणार आहे. संपूर्ण देश व्यापला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com