India
तृतीयपंथी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी घेतली लस
तृतीयपंथी कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अध्यक्ष अदर पूनावाला यांनी या सबंधित फोटो शेअर केला आहे.
समाजातील अनेक घटक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत. यामध्ये तृतीयपंथी समाजही एक आहे. या समुदायातील लोकांना देखील प्राधान्याने लस मिळायला हवी यासाठी सिरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.
या ट्वीटमध्ये ते म्हणतात, तृतीयपंथी कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. "मला नेहमीच असं वाटत आलं आहे की, आरोग्यसेवा आणि प्रतिष्ठा हे मूलभूत मानवी अधिकार आहेत. मी तृतीयपंथी समाजाला समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना सहकार्य करण्यास उत्सुक आहे", अशी पोस्ट त्यांनी फोटोवर लिहिली आहे.