SHARAD RAO
Mumbai
मेट्रो स्थानकाला शरद राव यांचे नाव देण्याची मागणी
कामगार क्षेत्रांत प्रचंड काम केलेल्या व कामगारांसाठी जीवाचं पाणी केलेल्या मोजक्या कामगारनेत्यांपैकी एक म्हणजे शरद राव. शरद राव हे गोरेगावमधील बांगूर नगर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे कामगारांच्या चळवळीचे एकेकाळी ते केंद्रस्थान बनले होते. ह्याच पार्श्वभूमीवर बांगूर नगर येथे बनविण्यात येणार असलेल्या मेट्रो स्थानकाला स्वर्गीय शरद राव यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी सेवा सारथी ऑटोरीक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियनने पत्राद्वारे केली आहे.