Tulsi Vivah 2023 : तुळशीचं लग्न लावण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या तुळशी विवाहाची संपूर्ण विधी
तुळशी विवाह 2023 : कार्तिक महिन्याच्याशुक्ल पक्षातील एकादशी तिथीला, भगवान विष्णूचा शालिग्राम अवतार आणि माता तुळशी यांचा विवाह झाला. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. या शुभ दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. यावर्षी तुळशी विवाह २३ नोव्हेंबरला आहे. या दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीचा विवाह होणार आहे.
कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात.
मुहूर्त :
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11.03 पासून सुरू होत आहे. 23 नोव्हेंबर रोजी रात्री 09.01 वाजता संपेल. एकादशी तिथीला रात्रीच्या पूजेची वेळ संध्याकाळी 05.25 ते 08.46 पर्यंत आहे. तुमची इच्छा असल्यास या शुभ मुहूर्तावर तुळशीविवाह करू शकता.
पूजा विधी :
विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करण्यात येतं. त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढण्यात येतं. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करा. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार किंवा हौसेने तुळशीला सजवतात आणि हा सोहळा थाट्यात करतात. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील परिधान करतात. तुळशीला नवरीसारखे सजवलं जातं. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा केली जाते. वृंदावनात ऊस, झेंडूची फुलं अर्पण केली जातात. तर मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवण्यात येतो. हा विवाह सोहळा संध्याकाळी संपन्न करण्यात येतो. तुळशीविवाहासाठी अंगणात छान रांगोळी काढली जाते.