केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता; मुख्यमंत्री पदाची घोषणा करणार?
थोडक्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता
अमित शाह नव्या सरकारची आणि मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्याची शक्यता
दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर अमित शाह मुंबईत येत असल्याने चर्चा सुरू
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. 14 व्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस असून पुन्हा एकदा नव्याने महायुतीचे सरकार येणार आहे.
लवकरच महायुती सरकार स्थापन करणार असून मुख्यमंत्री कोण असणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? सत्ता स्थापन कधी होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमित शाह नव्या सरकारची आणि मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर अमित शाह मुंबईत येत असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून फडणवीसांच्या नावाची शक्यता आहे.