पाणीपुरीच्या पाण्यातच लघुशंका, व्हिडीओ व्हायरल
पाणीपुरी हा पदार्थ बहुतेक सर्वांनाच आवडतो. पाणीपुरी हा पदार्थ लॉक हॉटेलपेक्षाही लोकांना ठेल्यावर, स्टॉल्सवर जाऊन खायला परंती देतात. परंतु आता अशाच एका पाणी पुरी स्टॉल्सवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून काही लोक माणुसकीच्या नावाखाली कलंक आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. एका पाणी पुरी विकणाऱ्याने पाणी पुरीच्या पाण्यामध्ये केल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये
या व्हायरल व्हिडीओमध्ये, हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की पाणीपुरी विकणारा व्यक्ती मग मध्ये लघवी करतो आणि नंतर तेच मग वापरून लोकांना पाणी पुरी देतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या व्हिडीओ गुवाहाटीमधील आठगाव भागातला आहे. ट्विटर युजर मामून खान यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
नेटीझन्सकडून संताप व्यक्त
अवघ्या १० सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत अनेक हजार लोकांनी बघितलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रीट्विटही केला आहे. या सर्व प्रकारामुळे पाणीपुरीवल्यावर कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली जात आहे.
यापूर्वी घडलेली घटना
२०११ साली नौपाडा (ठाण्याजवळ) येथील ५९ वर्षीय पाणीपुरी विक्रेता होता त्यानेही असचं कृत्य केलं होतं. राजदेव लखन चौहान असं त्या विक्रेत्याचं नाव होत.अंकिता राणे या तरुण विद्यार्थिनीने हा प्रकार बघितल्यावर त्याचा व्हिडीओ केला. तो व्हिडीओ तिने आजूबाजूच्या रहिवाशांनाही दाखवला. हा प्रकार तो रोज करत असल्याचं लक्षात आलं. पुढे त्याला पोलिसांनी अटक केली.