एका रात्रीत लसउत्पादन वाढवता येत नाही’ – पूनावाला
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. देशात १८-४४ वयोगटासाठी लसीकरणाची सुरुवात झाली असून लशींची मागणी वाढली आहे. यावर लस निर्मिती ही कौशल्याधारित प्रक्रिया असून एका रात्रीत लसउत्पादन वाढवता येत नसते, असे पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येचाही विचार करायला हवा.
सर्व प्रौढांसाठी कमी काळात लस मात्रा तयार करणे सोपे काम नाही. अनेक प्रगत देशांतही कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी धडपड करीत आहेत, तुलनेने त्या देशांची लोकसंख्या आपल्यापेक्षा खूप कमी आहे. पुढील काही महिन्यांत ११ कोटी लशी सरकारला देण्यात येणार आहेत. माझ्या काही वक्तव्यांचे चुकीचे अर्थ काढले गेले असून त्यावर स्पष्टीकरण करणे महत्त्वाचे आहे. असे देखील अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. १०० टक्के अग्रिम रकमेपोटी भारत सरकारकडून १७३२.५ कोटी रुपये मिळाले आहेत, असे अदर पूनावाला यांनी सांगितले.