व्हिडिओ
Mumbai Local : सीएसएमटी-खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार
सीएसएमटी-खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार असल्याची माहिती मिळत आहे.
(Local Train) सीएसएमटी-खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 15 डब्यांच्या सेवा वाढविण्याचे निर्देश दिले होते.
ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या 10 स्टेशनवर 26 प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील 24 स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25 टक्के वाढणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणार आहेत.