ललित पाटील प्रकरणी 2 पोलिसांना अटक

ससून रूग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या ललित पाटील प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचार्‍यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 च्या पोलिसांनी अटक केली आहे.
Published by  :
Team Lokshahi

ससून रूग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या ललित पाटील प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचार्‍यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे संपुर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ललित पाटीलने ज्या दिवशी ससून रूग्णालयातून पलायन केले त्या दिवशी ससून रूग्णालयात बंदोबस्तावर असणार्‍या पोलिस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव या मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या पोलिसांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने अटक केली आहे. ललित पाटीलने ज्या दिवशी ससून रूग्णालयातून पलायन केले होते त्या दिवशी हे दोघेही ड्युटीवर होते. कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com