Mumbai : दादर, घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन

दादर, घाटकोपर, भाडुंप आणि मुलुंडमध्ये आज पाणी येणार नाही. मुलुंडमध्ये जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद आहे.
Published by :
Dhanshree Shintre

दादर, घाटकोपर, भाडुंप आणि मुलुंडमध्ये आज पाणी येणार नाही. मुलुंडमध्ये जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद आहे. सकाळी 11.30 ते उद्या सकाळी 11.30 पर्यंत पाणी येणार नाही. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महापालिकेतर्फे गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड परिसरातील फोर्टिस रुग्णालय ते उद्यद्योग क्षेत्रालगत असलेली 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कारणास्तव आज, शुक्रवारी सकाळी 11:30 ते शनिवार सकाळी 11:30 या वेळेत घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com