NCP : राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन,अजित पवार गट आणि राष्ट्रवादी SP दोघेही वर्धापन दिन साजरा करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन साजरा होत आहे. पक्षाला 25 वर्ष पूर्ण होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन साजरा होत आहे. पक्षाला 25 वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आपला वर्धापन दिन आज माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉल या ठिकाणी साजरा करणार आहे. त्यापूर्वी त्यांनी सकाळी 10:10 वाजता पक्ष कार्यालयात अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळेस त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे आपला वर्धापन दिन अहमदनगरच्या न्यू आर्टस् कॉलेज मैदानावर साजरा करणार आहेत. यंदा पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाला आहे. त्यामुळे यंदाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचं देखील कळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com