Tahawwur Rana : आरोपी तहव्वुर राणाला NIA कोठडीत शिक्षेची भीती, सूत्रांची माहिती

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला NIA कोठडीत कठोर शिक्षेची भीती.
Published by :
Prachi Nate

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आले आहे. भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर एनआयएने त्याचा ताबा घेतला आहे. यानंतर त्याला 18 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर तहव्वुर राणाकडून चौकशी करण्यात आली. या हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाबला ज्या प्रकारे फाशी दिली, त्याचप्रमाणे तहव्वुर राणालाही फाशी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

एनआयएच्या चौकशी दम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा याला एनआयए कोठडीत कठोर शिक्षेची भीती वाटत आहे. त्याला भीती आहे की, कसाबप्रमाणे त्यालाही मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. अशा परिस्थितीत, राणा अधिकाऱ्यांकडून कायदेशीर प्रक्रिया आणि शिक्षेबद्दल प्रश्न विचारत सतत माहिती गोळा करत आहेत. इतकेच नाही तर तहव्वुर राणा त्याच्यावर लादलेल्या कायद्याच्या प्रत्येक कलमाची माहिती गोळा करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com