Ram Mandir PranPrathistha : सोहळ्यानिमित्त विरामध्ये 3 हजार 846 फुटाची रामाची रांगोळी

20 ते 22 रांगोळी कलाकारांच्या परिश्रमातून 3 हजार 846 फुटाची श्रीरामाची रांगोळी साकारण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

मागच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेच्या मनवेलपाडा-कारगिल नगर रोडवर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, आजीव पाटील यांच्या पुढाकारातून भव्य अशी श्रीरामाची रांगोळी काढण्यात आली आहे. 20 ते 22 रांगोळी कलाकारांच्या परिश्रमातून 3 हजार 846 फुटाची श्रीरामाची रांगोळी साकारण्यात आली आहे. मागच्या दोन दिवसांपासून ही रांगोळी काढण्यात येत आहे. उद्या श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेनंतर विरार मध्ये रांगोळीच्या माध्यमातून रामभक्तांना श्रीरामाचे दर्शन घडणार असल्याने रामभक्तात एक आनंदाचे वातावरण पसरले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com