Rohit Patil | तासगावच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, रोहित पाटील नावाचे 4 उमेदवार रिंगणात | Lokshahi

तासगाव निवडणुकीत रोहित पाटील यांच्या विरोधात तीन डमी उमेदवारांची नोंदणी, विरोधकांचा डाव उघड

राष्ट्रवादी शरद पवार गडाचे तासगाव कडे मंडळाचे उमेदवार रोहित पाटील यांना आता घेरण्यासाठी डमी उमेदवारांचा डाव आखण्यात आलाय. रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील नावाचे उमेदवारी अर्ज तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात दाखल झाले आहेत. रोहित राजगोंडा पाटील, रोहित रावसाहेब पाटील आणि रोहित राजेंद्र पाटील अशा आर आर पाटील नावाच्या तिघांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. या उमेदवारीमागे विरोधकांचा डाव असल्याचा आरोप रोहित पाटील गटाकडून करण्यात आलाय.

रोहित पाटलांना नामोहरण करण्यासाठी विरोधकांची ही खेळी असल्याचा आरोप देखील रोहित पाटील गटाने केला आहे. आता उमेदवारी अर्ज दरम्यान या तिघांचे अर्ज माघार घेतले जातात ते तिघे रोहित पाटील नावाचे उमेदवार मैदानात असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र रोहित पाटलांच्या मतांच्या विभागणीसाठी रोहित पाटलांच्या नावाच्या या तीन रोहित पाटलांना मैदानात उतरवलं गेले अशी चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com