Beed : 4 पतसंस्था, अर्बन बॅंकांना कुलूप

मागील वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यात चार पतसंस्था आणि अर्बन बँकांना कुलूप लागले आहे. परिणामी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्या आहे.
Published by :
Team Lokshahi

मागील वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यात चार पतसंस्था आणि अर्बन बँकांना कुलूप लागले आहे. परिणामी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्या आहे. अतिशय विश्वासू मानली जाणारी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचा देखील यात समावेश आहे. द कुटे ग्रुप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश कुटे या बँकेचे संचालक आहेत. परंतु मागील तीन महिन्यांमध्ये ही मल्टीस्टेट अडचणी सापडली आहे. या बँकेच्या संपूर्ण राज्यभरात 50 शाखा असून यात जवळपास साडे तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. सर्वसामान्य ठेवीदार बँकेचे उंबरठे झीजवून देखील या ठेवी त्यांना मिळत नाही आहे. काहींचे वैद्यकीय, शैक्षणिक, लग्न असे काम पैसे मिळत नसल्याने रखडले आहेत. ही आपबिती सांगताना ठेवीदारांना अश्रू अनावर झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com