मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या 8 नावांवर शिक्कामोर्तब?

शिवसेनेच्या मंत्रिपदासाठी 8 नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. इतर नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात घडामोडींना वेग आला आहे. 15 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. तर 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळात कोणाला कोणतं खातं आणि मंत्रिपद मिळणार याबाबत तर्क लढवले जात आहेत.

शिवसेनेच्या 8 नावांवर शिक्कामोर्तब?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 8 नावांवर शिक्कामोर्तब झालं असून इतर नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. इतर नावांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. शिक्कामोर्तब झालेली नावं पुढीलप्रमाणे आहेत:

१) उदय सामंत
२) शंभूराज देसाई
३) दादा भुसे
४) संजय शिरसाठ
५) विजय शिवतारे
६) प्रताप सरनाईक
७) आशीष जैस्वाल
८) प्रकाश आबिटकर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com