व्हिडिओ
Nagpur : चांद्रयानसाठी चक्क 7 फूट व्यासाची राखी शास्त्रज्ञांना समर्पित
रक्षाबंधन आणि पर्यावरणाचा मध्य साधत नागपूरच्या महिलांनी इको फ्रेंडली राखी तयार केली आहे.
नागपूर: रक्षाबंधन आणि पर्यावरणाचा मध्य साधत नागपूरच्या महिलांनी इको फ्रेंडली राखी तयार केली आहे. तर हीच 7 फूट व्यासाची आणि 22 फूट घेर असलेली राखी चांद्रयान तीन मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांना समर्पित केली आहे. त्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत करून ही मोहीम यशस्वी केली आहे. त्या शास्त्रज्ञांना तिथे जाऊन राखी बांधण शक्य नाही. म्हणून ही राखी महिलांनी झाडाला बांधलेली आहे आणि याच राखी मधून अनेक संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न देखील केला आहे.