Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींवर आसाममध्ये गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आसाममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात गर्दीला चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आसाममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात गर्दीला चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मंगळवारी गुवाहाटीत प्रवेश नाकारण्यात आला. शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होईल असे कारण देत आसमचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी परवानगी नाकारली. त्यानंतर काही वेळाने, सरमा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना राहुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. राहुल आसाममधील शांतताप्रिय जनतेला चिथावणी देत असल्याचा आरोप करत सरमा यांनी त्यांच्यावर ‘नक्षलवादी डावपेच’ लढवल्याची टीका केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com